जन्माला येतानाच आपण, जोडत असतो अनेक नाती,
विविध स्वभाव, मते विविध, कुटुंब धाग्यात गोवले जाती..
आई, वडील, भाऊ, बहीण, आज्जी आबांचा लळा,
आत्या, काका, मामा, मावश्या, मायेचा गोतावळा!
रक्ताची ही नाती सगळी, सुखदुःखातील सांगाती,
आणि जणू कुटुंबच होती, काही खास मैत्र, सखे-सोबती!
कुटुंब दिनी सदिच्छा, लाभो ह्या सर्वांना सुख परम,
पुढे जमेल का कधी आचरायला, 'वसुधैव कुटुंबकम्'?!
No comments:
Post a Comment