महिला दिनावरचं लिखाण करत होते तेव्हा ईशानची - माझ्या लेकाची - मधेमधे लुडबुड सुरु होतीच. 'अरे, हे मोठ्ठया माणसांचं आहे', असं टीप्पीकल उत्तर त्याला दिल्यावर लगेच धोसरा सुरु झाला - 'आई, तू माझ्यासाठी का लिहीत नाहीस कधीच काहीच? लहान मुलांचं काहीतरी लिही माझ्यासाठी आधी'. त्याच्यासाठी काहीतरी लिहायचं प्रॉमिस दिल्यावरच माझी सुटका झाली. ते प्रॉमिस पूर्ण करायचा केलेला हा प्रयत्न:
निघाली झुकझुकगाडी प्राण्यांची
सफर करायला जंगलाची..
छोटे छोटे प्राणी सगळे
झुक झुक करत गोळा झाले..
कोंबडयाने केले कुकूचकू
म्हणाला, शिट्टी झाली, चला निघू..
इंजिन बनले माकडभाऊ
त्यांच्या मागे मनीमाऊ..
तिच्या मागे भू - भू कुत्रा
त्याच्या मागे ससोबा भित्रा..
कासव म्हणाले मी पण येणार
ससा म्हणे, आम्ही जोरात धावणार..
मोर आला फुलवून पिसारा
हरणाचा तर वेगळाच तोरा..
भरपूर प्राणी, लांबडी गाडी
जंगलातून पळते वेडीवाकडी..
प्राण्यांच्या डोक्यावर एक-एक पक्षी
बघत चालले सगळे झाडांची नक्षी..
इतक्यात समोर आले वाघोबा
म्हणाले असाल तिथेच सगळे थांबा..
मी आहे म्हणे तिकीट चेकर
आपापली तिकीटे दाखवा भरभर..
ज्याच्याकडे तिकीट नसेल,
तो आज माझा खाऊ बनेल..
प्राण्यांची उडाली घाबरगुंडी
नको रे बाबा ही झुकझुकगाडी..
सगळ्यांनी तिथून धूम ठोकली
वाघोबाची फजिती झाली...
===============================================================
या कवितेवरुन, ईशान अगदी लहान असताना केलेलं एक बडबडगीत आठवलं. माझं तर असं अगदी स्पष्ट मत आहे की बाळ लहान असताना प्रत्येक आईमधून एक सुप्त कवयित्री बाहेर पडत असते. बाळाला भरवताना असेल, झोपवताना असेल नाहीतर रडणं थांबवताना पण प्रत्येक आई ही कधी ना कधी आपल्या बाळासाठी २-४ ओळी का होईना पण रचतेच रचते - अशा ओळी की ज्यांना एक 'personal touch' असतो. मग भले ते फार लयबद्ध नसेल किंवा व्याकरणाच्या नियमात मुळीच बसत नसेल, पण बाळाला तेच जास्ती आवडतं!! अशापैकीच हे एक छोटंसं बडबडगीत.
आम्ही लहान असताना एक कविता होती - 'इंजिनदादा इंजिनदादा काय करता? कोळसा मी खातो, पाणी मी पितो, गावाला जातो नव्या नव्या'.. त्या चालीवरचं हे माझ्या लेकासाठीचं गाणं..
उंदीरमामा उंदीरमामा, काय करता? उंदीरमामा उंदीरमामा, काय करता?
ची ची मी करतो, ची ची मी करतो, ईशानला हसवतो पळता पळता..
मनीमाऊ मनीमाऊ, काय करते? मनीमाऊ मनीमाऊ, काय करते?
म्याव मी करते, म्याव म्याव मी करते, ईशानच्या वाटीतून दुदू पिते..
शेरूभाऊ शेरूभाऊ, काय करतो? शेरूभाऊ शेरूभाऊ, काय करतो?
भू भू मी करतो, भू भू मी करतो, ईशानच्या मागे मागे फिरत रहातो..
कावळेदादा कावळेदादा, काय करता? कावळेदादा कावळेदादा, काय करता?
काव काव मी करतो, काव काव मी करतो, ईशानशी गप्पा मारतो येता जाता..
आणि ईशानभाऊ ईशानभाऊ, काय करता? ईशानभाऊ ईशानभाऊ, काय करता?
ही ही मी करतो, हसत राहतो, आईला पण हसवतो येता जाता!!

छान :)
ReplyDeleteवा! सुपर! ती उंदीरमामा तर अगदी चालीत वाचली ��
ReplyDeleteव्वा ! खूप छान आणि उत्स्फूर्त !
ReplyDeleteछान! ईशानचं 'बाळ'पण परत आठवलं!
ReplyDeleteSuper se upar.....Me mulana shikven zuk zuk gadichi Kavita
ReplyDelete❤️❤️❤️
ReplyDelete❤️❤️❤️
Delete