Friday, February 17, 2017

प्रिय अमृता....

कालच माझ्या ज्या बहिणीच्या मुलाच्या मुंजीबद्दल लिहिलं ती माझी मामेबहिण अमृता.. माझी अतिशय लाडकी बहिण! माझ्याहून जवळ जवळ ३ वर्षांनी लहान. पण लहानपणापासूनच आमच्यात खूप जवळिकीचे आणि मैत्रीचे संबंध. काल तिच्या लेकाच्या मुंजीबद्दल लिहीताना, मनात तिच्याच बद्दलचे विचार असल्यामुळे असेल कदाचित, अचानक तिच्याबद्दलच्या भावना कवितेचं रूप घेऊन आल्या! अमृ, ही कविता तुला सप्रेम सादर...


प्रिय अमृता...

गीत आले कुठून अचानक, साज लेऊनी मम भावांचे,
गूज मनीचे सांगायाला, तू स्थान माझे हक्काचे..
जन्मलो बहिणी म्हणूनी, परी नाते जपले मैत्रीचे...

किती वेगळ्या तरी किती सारख्या,
जिवाभावाच्या आपण सख्या..
वेगळेपण जपून दुसरीचे, नाते जपले सख्याचे...

ना सहवास रोजचा, ना सततच्या भेटीगाठी,
तरी मनाचा एक कोपरा राखलेला तुझ्यासाठी..
दूर अशा अंतरावरूनही, नाते जपले जवळिकीचे...

लागो दृष्ट ना कधी, राहो अभंग हे नाते,
वितुष्ट न येवो काही, देवाकडे हेच मागते..
गोडी राहो अनंत काळ, नाते जपले 'अमृता'चे!!!


12 comments:

  1. सुरेख! छान जमलंय

    ReplyDelete
  2. मनातले भाव तुझे शब्दरुपे साकारले,
    नात्यांचेहे तरल बंध कागदावरी आकारले..!

    हे नाते न जाणे वयाचे बंधन
    हे नाते न जाणे घराचे अंतर
    असे हे निर्मळ सख्य तुमचे
    टिकून राहो सतत निरंतर

    ReplyDelete
  3. अप्रतीम!तुम्हा दोघींच्या नात्यातील हे भावबंध हे असेच चिरंतन राहो अन् असेच काव्य तू सतत करीत राहो.

    ReplyDelete
  4. अरे वा! गहिवरुन आलं.असेच भावबंध जपा.
    निखिलचा हा गुण माहित नव्हता.अभिनंदन!

    ReplyDelete
  5. Majhyakade Shabd nahiyet..thank you for being there.. So many memories to be cherished..sagala Kasa dolyasmor yetay..
    Stay happy stay blessed always

    ReplyDelete