Valentine day बद्दल लिहिताना अचानक खूप पूर्वी केलेल्या दोन कविता आठवल्या. त्या इथे पोस्ट करण्याचा मोह होतोय. पैकी ही कविता तर खूपच जुनी म्हणजे ९७ साली, मी ११वी मधे असताना केलेली आहे.
प्रेम म्हणजे...
प्रेम म्हणजे काय असतं?
कुणालाच ते माहित नसतं!
सगळे नाना तर्क करतात,
प्रेमाला निरनिराळी नावे देतात..
पण खरंच प्रेम म्हणजे काय असतं?
कुणालाच ते माहित नसतं!
प्रेम असते देवाची देणगी,
प्रेमात माणूस बनतो त्यागी..
प्रेम सुंदर कोमल भावना!
मनोदैवताची मूक आराधना..
प्रेम कसं, बहुरूपी असतं,
कधी असं तर कधी तसं असतं..
प्रेम पाण्याप्रमाणे शुद्ध असतं,
प्रेम स्फटिकाप्रमाणे निर्मळ असतं..
प्रेम म्हणजे जीवन असतं,
प्रेम म्हणजे सबकुछ असतं!
प्रत्येकजण असा काहीतरी विचार करतो,
आपापलं मत सांगून जातो..
पण खरंच प्रेम म्हणजे काय असतं?
कुणालाच ते माहित नसतं!
खरंच, प्रेम म्हणजे काय असतं?
प्रेम म्हणजे फक्त प्रेमच असतं!
प्रेम म्हणजे काय ते जाणून घ्यायचंच नसतं,
प्रेमाचं सुंदर विश्र्व फक्त अनुभवायचं असतं!!!
अप्रतिम!! सुरेख! इतक्या सोप्या शब्दांत मस्त उलगडून सांगितलंय.
ReplyDeleteसमोरच्या व्यक्तीच्या मनात घर करायचं...
ReplyDeleteप्रेम म्हणजे कदाचीत हे ही असतं...
सुंदर..
ReplyDelete