काय करू, कळेना...
फराळाचं कसं बनवू,
मला काही सुचेना...
डोकं दुखतंय, ठणठण करतंय,
आवाज सहन होईना...
शांत बस म्हटलं तरी,
लेक काही ऐकेना...
डोळे दुखतायत, किरकिर करतायत,
पाणी गळणं थांबेना...
कामं सगळी पडलीयत पण,
काही करू वाटेना...
पडून राहते, मोबाईल बघते, 😜😜
नवऱ्याला ते बघवेना...
दुखणी सगळी कुठे गेली,
म्हणतो, मोबाईल बघताना...
डोळे दुखत नाहीत का, म्हणतो,
स्क्रीनकडे त्या बघताना...
पोराच्या आवाजाने डोकं उठतंय,
Reels चा त्रास कसा होईना... 🙄🙄
जळलं मेलं, टोमणे मारणं,
आराम माझा बघवेना... 😏😏
एवढ्या सर्दीत, काम कसं करू?
मोबाईलसाठी शक्ती पुरेना...
"खरंच" त्रास होत असेल तर,
गपगुमान, म्हणे, झोप ना...
औषध म्हणून, आधी मोबाईल,
लागतोच, त्याला कळेचना!! 😜😜
© रश्मी पानसे - नाझिरकर
सगळा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला अगदी 😷😜😃😃👌👌
ReplyDelete😐😑🥲🙃🤐
ReplyDelete