Friday, September 9, 2022

डायरीतलं पान...

डायरीतलं पान...

कित्येssक वर्षांनी, काल, नवीनच मित्रमैत्रिणींचा एक नवीनच ग्रुप तयार झाला आणि खरंच सांगते, कसलं भारी वाटलं माहितीये!!! 'इतकी मजा गेल्या कित्येक काळात आपण केलीच नव्हती बहुतेक' असंच वाटतंय कालपासून... ह्यावर आता माझे आधीपासूनचे मित्रमैत्रिणी 'म्हणजे आम्ही वेडे!!!' types look देतील कदाचित मला 😜 पण अर्थात त्यांची त्यांची जागा आहेच अबाधित आणि तरीही ह्या नव्या ग्रुपने वेड लावलंय!! 😄😄

ग्रुप create झाल्यापासून मी जवळजवळ अखंडच whatsapp वर पडीक आहे आणि अखंड हसतेय!!! ईशानने तर नंतर नंतर चिडचिडच करायला सुरुवात केली. शेवटी 'तुला कसं तुझ्या मित्रमित्रमैत्रिणींबरोबर enjoy करायला आवडतं, तसं मी कधीतरी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर धमाल केली तर एवढं काय रे?' असा नेहमीचा dialogue त्याच्या तोंडावर चिपकवलाच 😜😜 अर्थात, तो ही माझाच मुलगा, त्याने काय लगेच भुणभुण थांबवली नाहीच... पण हे असं काय रोजरोज होणारे का ---- त्याचं? हळूहळू होईलच की त्याला सवय! 😜😜🙈🙈 

खरं तर, मजा अशीय की मी हा जो नवीन ग्रुप, नवीन ग्रुप म्हणतेय त्यातल्या कित्येकांबद्दल मला जवळजवळ काहीच माहिती नाही. कोण कुठे राहतं, काय करतं, वय काये, एवढंच काय, त्यातल्या कित्येकांची नावंही माहिती नाहीयेत मला. आणि तरीही पहिल्या मिनिटापासून हास्याचे फवारे उडतायत. अगदी जुनी ओळख असल्यासारख्या गप्पा होतायत. चिडवाचिडवी तर अखंड!! हो, काही serious गप्पा पण होतात बरका!! आणि वाचन ह्या common धाग्यातून विणला गेलेला हा ग्रुप असल्यामुळे, वेगवेगळ्या कथांबद्दलच्या चर्चा ही असतात. All in all, a complete entertainment package!!! 😀😀 

थोडा विचार केल्यावर मला वाटलं की कदाचित कुणाची जास्त ओळख नसल्यामुळेच, उलट, हे इतकं छान गप्पाष्टक रंगलं असावं. कारण कुणालाच कुणाकडून काही अपेक्षा वगैरे नाहीत आणि आपली image वगैरे जपत बोलण्याचं काही botheration ही नाही... त्यामुळे फक्त आहे तो क्षण छान enjoy करणे एवढं एकच घडतंय आपोआप! 

ह्या ग्रुपमधले maximum members वयाने माझ्याहून लहानच असणारेत. पण मला कधीच कसलंच अवघडलेपण जाणवू दिलं नाही कुणीच... त्यामुळे मला खरंच young झाल्यासारखं, refreshed का काय म्हणतात तसं वाटायला लागलंय. (म्हणजे तशी अजून young च आहे म्हणा मी 😄😄 पण तरी....) अशा relaxation ची गरज प्रत्येकालाच असणारच!! किती दिवसांनी, एकटीशीच किती खदखदून हसलेय मी!! 

अर्थात, हे नवे संबंध कसे आता जन्मभरासाठी जोडले गेले वगैरे माझा काहीच दावा नाहीये. कदाचित हे नातं क्षणभंगुरतेचा शाप घेऊनही आलेलं असू शकतं किंवा, कोण जाणो, कदाचित ह्यातून जुळलेले काही बंध पुढे आयुष्यभरासाठी अगदी मजबूत होऊन राहतीलही... ह्या नात्याला काही भूतकाळ नव्हताच आणि भविष्यकाळात हे असेल की नाही हे ही मला माहित नाही, पण वर्तमानकाळ मात्र खुश करून टाकला एवढं नक्की!! 😊😊 Thanks friends for this wonderful, fun filled time!! ❤️❤️

चला, आता इथलं लिखाण खूप झालं, तिथे एव्हाना पाच एकशे msgs तरी पडले असतीलच!! सगळे वाचायचे म्हणजे खूप वेळ जातो रे बाबा!! 🤭🤭🤭 So, गेलं पाहिजे आता मला...

तळटीप: मी डायरी वगैरे मुळीच लिहीत नाही. पण असं लिहिल्याने कसं जरा वजन पडतं ना, उगीच एखाद्या famous व्यक्तीचं वगैरे लिखाण असल्याचं feel येतं, म्हणून आपलं उगीच.... 😜😜😜🙈🙈🙈


5 comments:

  1. Replies
    1. ❤️❤️❤️
      जमेल तेव्हा इतरही posts वाचून मत सांग गं नक्की...

      Delete
  2. Replies
    1. ❤️❤️❤️
      जमेल तेव्हा इतरही posts वाचून सांग गं...

      Delete
  3. मस्तच 👌
    आणि खरंच तर आहे की हे... भविष्य काय असणार माहित नाही पण आपण सर्व एका धाग्याने बांधले गेलो आहोत हे नक्की ♥️

    ते ईशान ला होईल हो सवय 🤭

    ReplyDelete